राज्यात राष्ट्रपती राजवटीवरून राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य!
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील हे दौरे करत आहेत. याचदरम्यान त्यांनी जळगाव येथे राज्याच्या संदर्भात एक सूचक वक्तव्य करून अनेकांची झोप उडवली आहे.
जळगाव : महाराष्ट्रात सत्तासंघर्षाच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे भवितव्य अवलंबून आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी पुर्ण झाली असून निकाल काहीच दिवसात येऊ शकतो. याचदरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून महाराष्ट्राचे दौरे आखले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील हे दौरे करत आहेत. याचदरम्यान त्यांनी जळगाव येथे राज्याच्या संदर्भात एक सूचक वक्तव्य करून अनेकांची झोप उडवली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या सत्तासंघर्षाच्या निकालावरून जयंत पाटील म्हणाले, सुप्रमी कोर्टाच्या निकालामध्ये शिंदे गटातील आमदार जर अपात्र झाले तर शिदें-फडणवीस सरकारला सत्तेत राहता येणार नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार आहे.
Published on: Mar 29, 2023 01:13 PM
Latest Videos