धुव्वाधार! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना ३ तासांचा अलर्ट, विजांच्या कडकडाटासह वादळ अन् मुसळधार पाऊस
VIDEO | हवामान खात्याकडून राज्यातील या तीन जिल्ह्यांना अलर्ट जारी, काही ठिकाणी गावांचा संपर्क तुटला
मुंबई, 28 जुलै 2023 | गुरूवारप्रमाणे आजही हवामान खात्याने मुंबई, गडचिरोली आणि यवतमाळला रेड अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, नागपूर, गोंदिया आणि भंडाऱ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अतिमुसळधार पाऊस पडण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात काही जिल्ह्यात इयत्ता पहिली ते 12 च्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात ३ तासांचा अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे. तिन्ही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या जिल्ह्यात मुसळधार पावसांना अक्षरशः कहर केले आहे. तर वर्धा नदीला पूर आला आहे. यवतमाळच्या वणीतील ७ गावांचा संपर्क तुटला आहे. या तिन्ही जिल्ह्यातील नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे.