Fast News | पावसासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी | 31 August 2021
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यभरात पावसाने जोर धरला आहे. राज्याच्या बहुतेक भागात काल रात्रीपासून संततधार ते जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे.
महाराष्ट्रात हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. हवामान विभागाचा इशारा खरा ठरला असून सोमवारी रात्री झालेल्या पावसानं मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. अचानक दरड कोसळल्यामुळे चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर कन्नड घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक वाहने आणि प्रवासी अडकले आहेत. चाळीसगाव मार्गे औरंगाबाद जाण्यासाठी इतर मार्गाने प्रवास करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
मुंबईतही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तर अजून दमदार पाऊस पडू शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
Latest Videos