जळगावकरांनो...देवदर्शन करताय? जिल्ह्यातील 34 मंदिरात ड्रेसकोड लागू!

जळगावकरांनो…देवदर्शन करताय? जिल्ह्यातील 34 मंदिरात ड्रेसकोड लागू!

| Updated on: Jun 06, 2023 | 6:52 AM

VIDEO | जळगाव जिल्ह्यातील 34 मंदिरांमध्ये येत्या आठ दिवसांत ड्रेसकोड लागू होणार

जळगाव : राज्यातील मंदिरांमधील सुरू असलेल्या ड्रेस कोडच्या मोहिमेत अनेक जिल्ह्यातील हिंदू मंदिर आपला सकारात्मक प्रतिसाद देताना दिसताय. काल राज्यातील मंदिरांमधील सुरू असलेल्या ड्रेस कोडच्या मोहिमेत आता विश्व हिंदू परिषदेने उडी घेतल्याच्या बातमीनंतर आज जळगाव जिल्ह्यातील 34 मंदिरांमध्ये येत्या आठ दिवसांत वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे. टप्प्याटप्प्याने अन्य मंदिरात देखील तीन महिन्यांमध्ये वस्त्रसंहिता लागू होईल असेही मंदिर महासंघाचे समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध पद्मालय मंदिर, पारोळ्यातील बालाजी मंदिर देवस्थान व सातपुडा निवासिनी मनुदेवी मंदिरांसह अन्य मंदिरांचा यात समावेश आहे.

Published on: Jun 06, 2023 06:52 AM