शीतल म्हात्रे यांच्या 'त्या' व्हिडीओची महिला आयोगानं घेतली दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या...

शीतल म्हात्रे यांच्या ‘त्या’ व्हिडीओची महिला आयोगानं घेतली दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या…

| Updated on: Mar 13, 2023 | 9:55 PM

VIDEO | महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून शीतल म्हात्रे यांच्या 'त्या' व्हिडीओची दखल, रूपाली चाकणकर यांनी उपस्थित केला सवाल?

मुंबई : शीतल म्हात्रे यांच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ प्रकरणी आता राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. शीतल म्हात्रे यांच्याबाबतीतचा व्हिडीओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला जात आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. राज्यातील महिला लोकप्रतिनिधींना माध्यमांवरून ट्रोल करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत, लोकप्रतिनिधींबाबत जर असे प्रकार होत असतील तर समस्त महिला वर्ग राज्यात सुरक्षित आहेत का हा प्रश्न आहे. महिलांना सायबर सुरक्षा प्रदान करणे हे ही तितकेच महत्वाचे आहे. अशा प्रकरणांमध्ये सायबर गुन्हे विभागाने गांभीर्याने आणि तातडीने कारवाई केल्यास त्याला वेळीच पायबंद होईल. शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओ प्रकरणी गृह विभागाने योग्य ती कारवाई तात्काळ करावी व यामागील नेमके सत्य समक्ष आणावे, अशी मागणीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

Published on: Mar 13, 2023 09:55 PM