MahaShivratri News : हर हर महादेव! शिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात भक्तांची गर्दी | VIDEO
Nashik Triambakeshwar Temple : महाशिवरात्रीनिमित्त राज्यासह देशभरातून आलेल्या भाविकांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात आज दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे. याबद्दल मंदिराचे विश्वस्त कडलक यांनी माहिती दिली.
महाशिवरात्र असल्याने आज नाशिक जिल्ह्यातील मंदिरात राज्यभरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केलेली बघायला मिळत आहे. आत्तापर्यंत तब्बल दीड ते दोन लाख भाविकभक्तांनी दर्शन घेतलं असल्याचं मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीसोबत बोलताना सांगितलं आहे.
महाशिवरात्रीनिमित्त राज्यभरातील शिवमंदिरे आज सजली भगवान शिव आणि पार्वती यांच्या विवाहाचा सोहळा म्हणून शिवजयंती साजरी केली जाते. एकीकडे प्रयागराज येथे महा कुंभमेळ्यात भाविक गर्दी करत असतानाच आज राज्यातील विविध शिव मंदिरात देखील भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केलेली बघायला मिळत आहे. भगवान शंकराच्या दर्शनासाठी मंगळवारी रात्रीपासून गर्दी झाली आहे. 12 ज्योतिर्लिंगपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील दर्शनासाठी भाविकांची रिघ बघायला मिळाली आहे. भाविकांना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये यासाठी मंदिर प्रशासनाकडून योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आलेले असून आज व्हीआयपी दर्शन व्यवस्था देखील बंद राहणार असल्याचं विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी सांगितलं आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर बरोबरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर, पुण्यातील भीमाशंकर मंदिरासह हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत.

आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना

मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?

जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड

गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
