2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
एका मुलाखतीत शरद पवारांनी २००४ पासून ते २०१९ च्या सत्तासंघर्षापर्यंत अनेक मोठी वक्तव्यं केली आहेत. २०१९ ला स्थापन झालेली महाविकास आघाडी २०१४ सालीच बनवण्याचं ध्येय होतं. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वितुष्ट निर्माण व्हावं यासाठीच भाजपने न मागता आम्ही त्यांना पाठिंबा दिल्याचे शरद पवार यांनी म्हटलंय
महाविकास आघाडीचा प्लॅन २०१४ सालीच होता, भाजपने न मागता दिलेला पाठिंबा हा त्याचा प्लॅन होता, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला. दैनिक लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी २००४ पासून ते २०१९ च्या सत्तासंघर्षापर्यंत अनेक मोठी वक्तव्यं केली आहेत. २०१९ ला स्थापन झालेली महाविकास आघाडी २०१४ सालीच बनवण्याचं ध्येय होतं. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वितुष्ट निर्माण व्हावं यासाठीच भाजपने न मागता आम्ही त्यांना पाठिंबा दिल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. ‘राज्याचं नियंत्रण हे तुलनात्मकदृष्ट्या शिवसेनेकडे गेल्याचं आम्हाला जास्त पसंत होतं. स्पष्ट सांगायचं तर मोदींनाच आमचा विरोध होता. आणि तो विरोध असेल तर त्यांच्यात अंतर कसं अतंर होईल याची काळजी घेण्याची आवश्यकता होती. काँग्रेस आणि काँग्रेस विचारांचे लोकं, शिवसेना या सर्वांचा एक पर्याय महाराष्ट्राला द्यावा हेच सूत्र आमच्या डोक्यात होतं. पण शिवसेना इतकी घट्ट भाजप सोबत होती. त्यामुळे शेवटी या गोष्टी कराव्या लागल्या’, असं शरद पवार म्हणाले.