Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रूपये कधी मिळणार? महायुतीच्या महिला नेत्यानं थेट वर्षच सांगितलं
गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात मोठ मोठ्या घोषणा केल्या होत्या. मात्र सत्तेत आल्यानंतर आणि सरकार स्थापन झाल्यानंतर बरेच दिवस झाल्यानंतर पीककर्ज माफी आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आश्वासनाचा विसर पडल्याचे दिसतंय.
विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात सरसकट पीककर्ज माफीची घोषणा केली होती. यासह लाडकी बहीण योजनेतील महिलांना २१०० रूपये देणार असं आश्वासन दिलं होतं. मात्र सत्ता आल्यापासून अद्यापही यावर कोणता निर्णय झाला नसल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महायुतीच्या या दोन आश्वासनावर दोन मोठ्या नेत्यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. ‘सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही. काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफी बाबत वक्तव्य केले होते. पण मी राज्यातल्या जनतेला सांगतो 31 तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा. जे आधी सांगितलं होतं, ते प्रत्यक्षात येत नाही. आता तशी परिस्थितीही नाही. भविष्यात परिस्थिती पाहून आम्ही निर्णय घेऊ. या आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही, तशी आपली परिस्थिती नाही’, असं स्पष्ट अजित पवार यांनी म्हटलं तर लाडकी बहीण योजनेवर बोलताना नीलम गोऱ्हे यानी २१०० रूपयांसाठी पाच वर्ष वाट पाहावी लागेल असंच म्हटलंय.

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम

पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच

'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'

...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
