पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील 'हे' प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी होणार बंद

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील ‘हे’ प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी होणार बंद

| Updated on: Jun 12, 2023 | 2:38 PM

VIDEO | श्री ज्ञानेश्वर आणि श्री तुकाराम महाराज यांची पालखी मार्गस्थ होणारे पुण्यातील प्रमुख रस्ते बंद

पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज शहरात दाखल होणार आहे. पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून यंदा लाइव्ह लोकेशन सुविधेचा वापर करण्यात येणार आहे. पालखी मार्गस्थ होणारे रस्ते पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड ,टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहे. सोयीनुसार टप्प्याटप्प्याने शहरातील मुख्य रस्ते वाहतूक पोलीस बंद करण्यात येणार आहे. तर पालखी सोहळ्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून अचूक नियोजन करण्यात आलंय. श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन तसेच पालखी मार्गस्थ होत असताना शहरातील रस्ते बंद करण्यात येतात. वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी पालखी मार्गावरील प्रमुख चौक आणि रस्ते टप्प्याटप्प्याने वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. लाइव्ह लोकेशन सुविधेमुळे पालखी सोहळ्याची माहिती नागरिकांना उपलब्ध होईल,तसेच वाहतुकीचे नियोजनही करणे शक्य होणार आहे. सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. diversion.punepolice.gov.in या लाइव्ह लोकेशनमुळे रस्ते खूप वेळ बंद राहणार नाहीत. पालखी मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यातील भाविकांच्या गर्दीचे नियोजन, अनुचित घटना रोखण्यासाठी बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.

Published on: Jun 12, 2023 02:38 PM