चिपळूणमध्ये मोठी दुर्घटना, बहादूर शेख नाका येथील उड्डाणपुल कोसळला

चिपळूणमध्ये मोठी दुर्घटना, बहादूर शेख नाका येथील उड्डाणपुल कोसळला

| Updated on: Oct 16, 2023 | 9:45 PM

चिपळूण पुलाखाली पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या घटनेच्या चौकशीची मागणी ठाकरे गटाने केलीय. जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत पुढील काम करू न देण्याचा इशाराही ठाकरे गटाने दिलाय. वाहनांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. घडलेल्या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आलीय.

चिपळूण : 16 ऑक्टोबर 2023 | रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणमधील बहादूर शेख नाका येथील उड्डाणपुलाचे काम सुरू असताना गर्डर कोसळल्याची घटना घडली. सकाळी या गर्डरला तडे गेल्याचे समोर आले होते. या गर्डरची पाहणी करण्यासाठी आमदार शेखर निकम दुपारी पोहोचले. याचवेळी हा गर्डर पूर्ण खाली कोसळला. गर्डर पडलेल्या उड्डाणपूलाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची टीम दाखल झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या अधिकाऱ्यांना ठाकरे गटाच्या नेत्यांनी काम सुरू करण्यापूर्वी थर्ड पार्टी ऑडिट का नाही केले नाही असा सवाल केला. घटना घडल्यानंतर इथे येण्यासाठी अधिकाऱ्यांना उशीर का झाला अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.

Published on: Oct 16, 2023 09:44 PM