Big Breaking : ‘पहलगाम’नंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, हवाई दल अन् लष्कराला मिळणार नवे वरिष्ठ कमांडर; 1 मे पासून…
येत्या १ मे पासून भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल होणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात सुरक्षेची चिंता वाढली आहे. दरम्यान, भारतीय लष्करात काही मोठे बदल करण्यात येत आहेत, जे 1 मे 2025 पासून हे नवे बदल लागू होणार आहेत. हवाई दल आणि लष्कराला नवीन वरिष्ठ कमांडर मिळणार आहेत. एअर मार्शल एन. तिवारी भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख होणार आहेत. तर एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची सीआयएससी पदावर नियुक्ती होणार आहे.
एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांची भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते एअर मार्शल सुजित धारकर यांची जागा घेतील, जे 30 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. तिवारी यांना 37 वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांनी कारगिल युद्धातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांची नॉर्दन आर्मी कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते जम्मू-काश्मीर आणि लडाखसारख्या संवेदनशील भागांची कमान सांभाळतील. याआधी ते लष्कराचे उपप्रमुख होते आणि त्यांनी काश्मीरमध्ये ब्रिगेडचे नेतृत्वही केले आहे.

फडणवीस शिंदेंपासून सावध रहा, कारण... संजय राऊतांनी काय दिला सल्ला?

पाकचा लष्कर प्रमुख भेदरला, कारवाईच्या भितीची धास्ती अन् लपून बसला...

पहलगाम हल्ल्यानंतरचा CCTV समोर, जीव मुठीत घेऊन पर्यटकांची धावाधाव अन्

भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्...
