PM Modi | मालवणीत दुर्घटना केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांसाठी मदत जाहीर

PM Modi | मालवणीत दुर्घटना केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांसाठी मदत जाहीर

| Updated on: Jun 10, 2021 | 3:57 PM

मालवणी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवांईकांना केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर, राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 

मुंबई : मुंबईतील (Mumbai) मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने (Residential Structures) मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.  मालवणी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवांईकांना केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर, राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत बुधवारी (9 जून) रात्री 11 वाजता ही दुर्घटना घडली. मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे.