माजी आमदार शेख यांच्यावर गुन्हा दाखल; काय कारण? नेमकं ‘या’ महानगरपालिकेत काय घडलं?
आंदोलनकर्त्यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी यांच्या नामफलकाला काळी शाई फासत त्यांच्याविरोधात बदनामीकारक घोषणाबाजी केली होती. यानंतर याप्रकरणी माजी आमदारांवर थेट गुन्हा दखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता नव्या वादालाच तोंज फुटले आहे.
मालेगाव : मालेगाव महानगरपालिकेत केलेल्या एका कृतीमुळं माजी आमदारासह 30 ते 40 कार्यकर्त्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणामुळं मालेगाव महानगरपालिकेत माजी आमदार आणि मनपा आयुक्त यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. याबाबत माहिती अशी की गेल्या आठवड्यात माजी आमदार शेख आसिफ शेख रशिद व त्यांच्या अन्य 30 ते 40 साथीदारांनी तीव्र आंदोलन केले होते. आंदोलनकर्त्यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी यांच्या नामफलकाला काळी शाई फासत त्यांच्याविरोधात बदनामीकारक घोषणाबाजी केली होती. यानंतर याप्रकरणी माजी आमदारांवर थेट गुन्हा दखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता नव्या वादालाच तोंज फुटले आहे. याशिवाय आंदोलकर्त्यांनी जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात माजी आमदार शेख आसिफ शेख रशीद यांच्यासह 30 ते 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.