Mamta Kulkarni Video : ‘माझ्याकडे २ लाखांची मागणी अन् लक्ष्मी नारायण त्रिपाठींच्या दबाव…’, ममता कुलकर्णीचा खळबळजनक खुलासा

| Updated on: Feb 10, 2025 | 6:08 PM

प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीला दिलेल्या महामंडलेश्वर पदावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. दरम्यान, त्यांच्याकडून महामंडलेश्वर हे पद काढून घेण्यात आलं. यानंतर ममता कुलकर्णीने या पदाचा राजीनामा दिला असून, व्हिडिओद्वारे अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. महामंडलेश्वर पदाच्या बदल्यात तिच्याकडे २ लाख रुपये मागितले गेले होते असेही तिने म्हटले आहे. तिच्या या धक्कादायक खुलाशांने एकच खळबळ उडाली […]

प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीला दिलेल्या महामंडलेश्वर पदावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. दरम्यान, त्यांच्याकडून महामंडलेश्वर हे पद काढून घेण्यात आलं. यानंतर ममता कुलकर्णीने या पदाचा राजीनामा दिला असून, व्हिडिओद्वारे अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. महामंडलेश्वर पदाच्या बदल्यात तिच्याकडे २ लाख रुपये मागितले गेले होते असेही तिने म्हटले आहे. तिच्या या धक्कादायक खुलाशांने एकच खळबळ उडाली आहे. ममता कुलकर्णीचा यासंदर्भातला एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तिने या पदाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे. व्हिडीओमध्ये तिने असं म्हटलं की, “मला दिलेल्या महामंडलेश्वर पदाबद्दल अनेकांना आक्षेप आहे. मी, महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी, या पदाचा राजीनामा देत आहे. मला दिलेला आदर माझ्या २५ वर्षांच्या तपश्चर्येसाठी होता, परंतु काही लोकांना मी महामंडलेश्वर असण्यावर आक्षेप आहे. अनेकांनी याबद्दल विरोध केला आहे. पण माझ्याकडे हे पद असलं नसलं तरी माझी काही हरकत नाहीये. कारण मी २५ वर्षे घोर तपश्चर्या केली आहे. माझ्या गुरुंच्या समोर बाकी कोणीच मोठं नाहीये.” असं म्हणत ममता कुलकर्णीने तिची नाराजी व्यक्त केली आहे.

Published on: Feb 10, 2025 06:08 PM
HSC Board Exam Video : पोरांनो…ऑल द बेस्ट! 12 वीची परीक्षा उद्यापासून अन् ‘या’ दिवशी लागणार रिझल्ट
सैफ अली खानची 15 हजार कोटींची मालमत्ता जप्त होणार? काय आहे प्रकरण?