“…आम्हाला ऊद्धव ठाकरे यांची काळजी वाटते”, मनीषा कायंदे असं का म्हणाल्या?
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीची धाड पडली आहे. यावरून संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि ईडीवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीची धाड पडली आहे. यावरून संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि ईडीवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊत यांना ईडीने धाडी टाकल्यावर त्याला सामोरं जायला हरकत काय? आगेदरच आरडाओरडा का करता? तुम्हाला कर नाही तर डर कशाला? राऊत यांच्या भाषेमुळे ऊबाठा गटाचे नुकसान होतंय,” आम्हाला ऊद्धव ठाकरेंची काळजी वाटते, असं मनीषा कायंदे म्हणाल्या. “तसेत ऊबाठा गटातील सगळ्याच शिवसैनिकांना मविआ कधीच आवडली नाही, सध्या सगळे नाराज आहेत, जनादेशाचा अपमान केल्याने ही अवस्था झाली आहे,” असंही मनीषा कायंदे म्हणाले.
Published on: Jun 22, 2023 02:22 PM
Latest Videos