सव्वा किलो चांदीतून साकारली अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती, बघा झलक
VIDEO | वर्ध्यातील मनोहर तुकाराम ढोमणे ज्वेलर्सने साकारली सव्वा किलो चांदीतून अयोध्येतील निर्माणाधिन राममंदिराची हुबेहूब प्रतिकृती
वर्धा : देशभरात आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. रामभक्तांचा हा उत्साह शिगेला पोहोचला आहे. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या राम मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिरातही रामनवमीची लगबग असून अयोध्येतील राम मंदिराचे काम कधी पूर्ण होणार याकडे साऱ्या हिंदूंचे लक्ष लागले आहे. तर अयोध्येला राममंदिराचे निर्माण होत असताना अशातच वर्ध्यात सव्वा किलो चांदीतून अयोध्या येथील निर्माणाधिन राममंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. वर्ध्यातील मनोहर तुकाराम ढोमणे ज्वेलर्सने दिल्लीहून ही प्रतिकृती तयार केली. श्रीराम नवमीनिमित्त वर्ध्याच्या गोल बाजार येथील श्रीराम मंदिरात दोन दिवस भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. प्रतिकृती तयार करण्यास सात ते आठ कारागिरांना एक महिन्याचा कालावधी लागला. चांदीच्या प्रतिकृतीत आकर्षक कोरीव काम करण्यात आल आहे. बघा सव्वा किलो चांदीतून साकारली अयोध्या राममंदिराची हुबेहूब प्रतिकृती