सरकार…. झोपू नका, बीडच्या सभेतून मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा एल्गार
शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर डाग लावला. कोणी म्हणतंय घरं जाळलं? कोणी म्हणतंय हॉटेल जाळलंय? आमच्यावर उगाच डाग लावलाय. आम्ही घाबरणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. निष्पाप मराठ्यांना अडकवण्याचं काम सरकारने केलंय, असा आरोप जरांगेंनी सरकारवर केलाय
बीड, २३ डिसेंबर २०२३ : माझ्या मराठ्यांना डिवचू नका, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. तर मराठा आरक्षण कसं आणतात ते नुसतच बघा. शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर डाग लावला. कोणी म्हणतंय घरं जाळलं? कोणी म्हणतंय हॉटेल जाळलंय? आमच्यावर उगाच डाग लावलाय. आम्ही घाबरणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. निष्पाप मराठ्यांना अडकवण्याचं काम सरकारने केलंय, असा आरोप जरांगेंनी सरकारवर केलाय. मराठ्यांना काही करायचं असतं तर आजच केलं असतं. सरकार झोपू नका. मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. मराठ्यांना राज्यात शांतता हवी. करोडोच्या संख्येने एकत्र आलाय. शांततेत शहरात गेला. शांततेत मैदानात आला आहे. विनाकारण त्याला डाग लावू नका त्यामुळे मराठ्याला विनाकारण डिवचू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
