आरक्षणावरून वादंग सुरूच,  नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर मनोज जरांगे पाटील तुटून पडले अन्...

आरक्षणावरून वादंग सुरूच, नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर मनोज जरांगे पाटील तुटून पडले अन्…

| Updated on: Feb 06, 2024 | 11:44 AM

आरक्षण मोर्चातून काय काय मिळालं हे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले यावेळी मनोज जरांगे यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सोशल मीडियावर लिहून टीका करता असं सांगून मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्या ट्वीटरचाही उल्लेख केला

मुंबई, ६ फेब्रुवारी, २०२४ : जल्लोष करून आणि वाशीपर्यंत येऊन काय मिळालं? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केला. तर आरक्षण मोर्चातून काय काय मिळालं हे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले यावेळी मनोज जरांगे यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सोशल मीडियावर लिहून टीका करता असं सांगून मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्या ट्वीटरचाही उल्लेख केला. सगेसोयरे यांची अधिसूचना राज्य सरकारने काढल्यानंतर राज ठाकरे यांनी ट्वीट केलं होतं. की, ‘श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा ,म्हणजे आपल्या मराठा बांधवांना, भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल!’ यावर काय म्हणाले मनोज जरांगे पाटील बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Feb 06, 2024 11:44 AM