‘सगेसोयरे’यावरील कायद्यासंदर्भात जरांगे पाटलांचा मोठा दावा काय? आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला अधिवेशन?
येत्या १५ फेब्रुवारीला अधिवेशन बोलावलं असून अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होणार असं जरांगे पाटील म्हणाले. सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होण्याची प्रक्रिया पार पडणार, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले. तर मंत्री दीपक केसरकर यांनी मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला की अधिवेशन बोलवणार....
मुंबई, ७ फेब्रुवारी २०२४ : सगेसोयरे यासंदर्भात राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दावा केला आहे की, फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात सगेसोयऱ्यांवर कायदा होणार आहे. येत्या १५ फेब्रुवारीला अधिवेशन बोलावलं असून अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होणार असं जरांगे पाटील म्हणाले. सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होण्याची प्रक्रिया पार पडणार, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले. तर मंत्री दीपक केसरकर यांनी मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला की अधिवेशन बोलवणार असल्याचे म्हटले आहे. सगेसोयऱ्यांची व्याख्या आणि त्यांच्या अध्यादेशासाठी जरांगे पाटील अडून बसले होते. वाशीपर्यंत आलेला आरक्षणाचा मोर्चा मुख्यमंत्र्यांनी सगेसोयरेंसंदर्भात राज्यपत्रित अधिसूचना जारी केल्यानंतर मागे परतला. आता जर विशेष अधिवेशनात सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर झालं तर ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली आहे. त्याआधारे त्यांच्या सर्व नातेवाईकांना सगेसोयरे समजून कुणबी जातप्रमाणपत्र देण्यात येणार आहे.