छगन भुजबळ यांच्या ‘त्या’ टीकेवर मनोज जरांगे बरसले; म्हणाले, ‘मराठ्यांचं रक्त प्यायले…’
tv9 Marathi Special Report | आंतरवाली सराटी या गावात झालेल्या मराठा समाजाच्या सभेतून जरांगे पाटील यांनी गुणरत्न सदावर्ते आणि छगन भुजबळ यांचा चांगलाच समाचार घेतला असल्याचे पाहायला मिळाले. मराठ्याने तुला मोठं केलं, त्यांचंच रक्त पिऊन तू पैसा कमावला, असा एकेरी उल्लेख केला
मुंबई, १५ ऑक्टोबर २०२३ | जालन्यातील आंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. या सभेतून जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पलटवार केलाय. सभेची १०० एकर जागा आणि ७ कोटी खर्चांच्या आरोपांवरून जरांगे भुजबळांवर चांगलेच बरसले. त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावरदेखील टीका केली. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेपूर्वीच छगन भुजबळ यांची समता परिषदेतील एक क्लिप व्हायरल झाली. त्यावरून जरांगे पाटील संतापले. ७ किंवा १० कोटी नव्हे तर गोदा काठच्या २२ गावांनी २१ लाख रूपये जमवले असल्याचे त्यांनी सांगितले. समता परिषदेतील या क्लिपनंतर धमक्या येत असल्याची तक्रार भुजबळ यांनी पोलिसांत दिल्या. मराठ्यांनी मोठं केलं असल्याचे सांगत फोनवरून धमक्या येत असल्याचे भुजबळ म्हणाले.
Latest Videos
Latest News