राजकीय नेत्यांच्या घरात घुसून मी…, मनोज जरांगे पाटील यांची मुलगी संतापली
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमरण उपोषणाला बसलेत आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. आज त्यांनी सरकारला पुन्हा इशारा दिलाय. जर आरक्षण दिलं नाही तर मी पुन्हा जलत्याग करेल. दरम्यान, यावर जरांगे पाटील यांची कन्या पल्लवी हिचे भाष्य
जालना, १ नोव्हेंबर २०२३ | मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमरण उपोषणाला बसलेत आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. आज त्यांनी सरकारला पुन्हा इशारा दिलाय. जर आरक्षण दिलं नाही तर मी पुन्हा जलत्याग करेल. दरम्यान, यावर जरांगे पाटील यांची कन्या पल्लवी हिने भाष्य केले आहे. ती म्हणाली, या सरकारला कळायला नको का? मागच्या वेळी देखील १७ दिवस आमरण उपोषण केले. तेव्हा ही सरकारने आश्वासन दिले की मराठा समाजाला आरक्षण देऊ. मात्र त्यावेळी देखील सरकारने विश्वासघात केला. यावेळी उपोषणाला बसले तर सरकारकडून नुसतं तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. पण मराठा आरक्षणासंदर्भात शासनादेश काढा. तुम्ही वंशावळी असलेला, कुणबी जातीची नोंद असलेला शासनादेश काढता मग तुम्ही सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शासनादेश का काढत नाही, असा थेट सवाल जरांगे पाटलांची कन्या पल्लवी जरांगे पाटील हिने सरकारला केलाय. पुढे ती असेही म्हणाले, आता जर माझ्या वडिलांच्या जीवाला काही झालं ना तर मी त्यांची मुलगी म्हणून सांगते या राजकीय नेत्यांच्या घरात घुसून मी त्यांना हाणेन, असा इशारादेखील तिने सरकारला दिला आहे.