जरांगे पाटील म्हणाले, सरकारचं अन् आपलं ठरलंय… सरकारसोबत गुपचूप नेमकं काय ठरलं?
ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत, त्यांच्यासाठी कायदा तयार करून २४ डिसेंबरच्या आत सरसकट आरक्षण देणार, असं सरकारसोबत ठरल्याचे जरांगे म्हणाले. आता सरकार आणि जरांगे पाटील यांचं गुपचूप काय ठरलं ? विजय वडेट्टीवार अधिवेशनात जाब विचारणार असल्याचे त्यांनी म्हटलंय
मुंबई, २४ नोव्हेंबर २०२३ : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून भाष्य केले आहे. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी मिळणार नाही, त्यांना कायदा करून आरक्षण देणार असल्याचं सरकार सोबत ठरलंय, असा दावा जरांगे पाटील यांनी केलाय. सरसकट आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर सभेतून मोठं वक्तव्य केलं आहे. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत, त्यांच्यासाठी कायदा तयार करून २४ डिसेंबरच्या आत सरसकट आरक्षण देणार, असं सरकारसोबत ठरल्याचे जरांगे म्हणाले. आता सरकार आणि जरांगे पाटील यांचं गुपचूप काय ठरलं ? असं विचारत विजय वडेट्टीवार अधिवेशनात जाब विचारणार असल्याचे त्यांनी म्हटलंय. जरांगे पाटील यांचं २ नोव्हेंबरला जरांगेचं उपोषण सोडवताना सरकारच्या शिष्टमंडळात उदय सामंत, बच्चू कडूही होते. जरांगेंच्या दाव्यावर काय म्हणाले हे दोन्ही नेते…