तर खूप जड जाणार, जरांगे पाटलांचा मुंडे बंधू-भगिनींवर गंभीर आरोप अन् दिला इशारा
जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे जातीयवादाचा आणि पंकजा मुंडे यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप केला. मराठा आरक्षणावरून सरकारला धारेवर धरणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झालेत. तर मुंडे बंधू-भगिनींवर जोरदार हल्लाबोल केलाय. मुंडे बंधू-भगिनी समाजाला फूस लावून धमक्या देत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला
मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे बंधू-भगिनींवर जोरदार आरोप करत त्यांना गंभीर इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे जातीयवादाचा आणि पंकजा मुंडे यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप केला. मराठा आरक्षणावरून सरकारला धारेवर धरणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झालेत. तर मुंडे बंधू-भगिनींवर जोरदार हल्लाबोल केलाय. मुंडे बंधू-भगिनी समाजाला फूस लावून धमक्या देत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे बंधू-भगिनी गंभीर आरोप केल्यानंतर यावर पंकजा मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कोणीतरी बोलतं म्हणून त्यावर बोलण्याची आवश्यकता नाही, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. उपोषण करून कुणाला आरक्षण मिळत नसल्याचे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होते. यानंतर जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर देत इशारा दिला होता. नेमकं काय म्हणाले होते. जरांगे पाटील बघा व्हिडीओ?