AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation : नांदेडमधील मैदान मराठ्यांच्या गर्दीनं कच्चून भरलं, नुसतं भगवं वादळ

Maratha Reservation : नांदेडमधील मैदान मराठ्यांच्या गर्दीनं कच्चून भरलं, नुसतं भगवं वादळ

| Updated on: Dec 08, 2023 | 6:39 PM

नांदेड शहरातील वाडी पाटी येथील जिजामाता नगर येथे आज जरांगे पाटील यांची सभा पार पाडली. नांदेड जिल्ह्यात जरांगे पाटील यांच्या चार सभा होणार आहेत. जिजामाता नगर येथील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड, ८ डिसेंबर २०२३ : मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर दौरे सुरू आहेत. नांदेड शहरातील वाडी पाटी येथील जिजामाता नगर येथे आज जरांगे पाटील यांची सभा पार पाडली. नांदेड जिल्ह्यात जरांगे पाटील यांच्या चार सभा होणार आहेत. जिजामाता नगर येथील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित झाला होता. तर नांदेडमधील मारतळा येथे आज असलेल्या सभेसाठी २४ गावातील मराठा बांधवांनी तयारी करत जरांगे पाटील यांच्यावर मोठी पुष्पवृष्टीकरत जंगी स्वागत केलं. वारकरी दिंडी व पारंपारिक पद्धतीने त्यांचं स्वागत झाल्याचे पाहायला मिळाले. उमरा सर्कलच्या पुढाकाराने १०० एकरच्या मैदानावर ही सभा होती. तर मराठ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून, दीड हजार स्वयंसेवकांचा समावेश आहे.बांधवांसाठी १० हजार पुरी-भाजी पाकीट, ४५ क्विंटल खिचडी आणि २५ हजार पाणी बॉटलची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

Published on: Dec 08, 2023 06:36 PM