मराठा आरक्षणावर चकार शब्दही नाही म्हणजे…, जरांगे पाटील यांचा मोदींना आक्रमक सवाल
tv9 Marathi special report | मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पाणीही सोडलंय. आता सरकारनं आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करु नये, असा इशारा दिला. तसंच मोदी यांना क्षत्रिय मराठ्यांची गरज नाही का? असा आक्रमक सवालही जरांगे पाटील यांनी केलाय
मुंबई, २७ ऑक्टोबर २०२३ | मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पाणीही सोडताना सरकारला इशारा दिलाय. आता सरकारनं आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करु नये, असे प्रयोग सरकारला परवडणार नाही, असं जरांगे पाटील म्हणालेत. कुणबी जातप्रमाणपत्राशिवाय माघार नाही, असा एल्गार जरांगे पाटलांनी केलाय. महाराष्ट्रातल्या गावागावात साखळी उपोषणं सुरु होणार असल्याची माहितीही यावेळी जरांगेंनी दिली. मराठा आरक्षणावर ठोस मार्ग काढण्यासाठी सरकारला आणखी वेळ हवा. पण अधिक वेळ देण्यास जरांगेंची आता तयारी नाही. अशातच उद्धव ठाकरेंनी मोदींच्या शिर्डी दौऱ्यावर बोट ठेवलं. शिर्डी पंतप्रधान मोदी येऊन गेलेत. मात्र त्याआधी उद्धव ठाकरेंनीच प्रतिक्रिया दिली. ज्यात मोदींनी जरांगेंशी भेट घेऊन प्रश्न सोडवाव असं म्हटलं आहे. तर मोदी आपल्या भाषणात मराठा आरक्षणावर चकार शब्दही काढत नाहीत म्हणजे त्यांना क्षत्रिय मराठ्यांची गरज नाही, असाच त्याचा अर्थ होतो असं जरांगे पाटील म्हणालेत. बघा काय केला जरांगे पाटील यांनी सवाल?