‘काय कमावलं अन् काय गमावलं हे 13 जुलैला…’, मनोज जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
'मुख्यमंत्र्याला जातीत तोलयाच नसते. मुख्यमंत्र्याला कुणी काय म्हणावं? हा ज्याचा त्यांचा प्रश्न मी प्रवक्ता नाही. एक वर्ष झाला आता काय मिळवलं? काय गमावलं? हे सांगेल. 13 जुलै नंतर हे सांगता येईल. नंतर कोण काय गमावेल? हे पण समजेल', मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा
मनोज जरांगे पाटील यांना सरकारच्या शिष्टमंडळानं भेट देऊन आश्वासन दिल्यानतंर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी एक महिन्याचा वेळ देत आमरण आंदोलन स्थगित केलं. दरम्यान, 13 जुलैनंतर उपोषणामुळे काय गमावलं हे सांगणार असल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. तर 13 जुलैनंतर उपोषणामुळे कोणाला काय गमवालं लागणार? हे देखील सांगणार असल्याचे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट इशाराच दिला आहे. ‘मुख्यमंत्री एका जातीचे नाही. मुख्यमंत्र्याला जातीत तोलयाच नसते. मुख्यमंत्र्याला कुणी काय म्हणावं? हा ज्याचा त्यांचा प्रश्न मी प्रवक्ता नाही. एक वर्ष झाला आता काय मिळवलं? काय गमावलं? हे सांगेल. 13 जुलै नंतर हे सांगता येईल. नंतर कोण काय गमावेल? हे पण समजेल’, असं जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तर दुसऱ्यांचे मुल डोळ्यासमोर ठेवलं पाहजे. माराठ्याचे मुल मोठं झालं पाहजे, हे छातीवर हात ठेऊन विचार केला पाहिजे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.