प्रजासत्ताक दिनीच भगवं वादळ मुंबईत धडकणार, जरांगेंचा लाँग मार्च, असं आहे वेळापत्रक

प्रजासत्ताक दिनीच भगवं वादळ मुंबईत धडकणार, जरांगेंचा लाँग मार्च, असं आहे वेळापत्रक

| Updated on: Jan 15, 2024 | 5:59 PM

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आता थेट मुंबईत धडकणार आहे. या आंदोलनाचा मार्ग नेमका कसा असणार आहे, याची माहिती स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. बघा कसा असणार

मुंबई, १५ जानेवारी २०२४ : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आता थेट मुंबईत धडकणार आहे. या आंदोलनाचा मार्ग नेमका कसा असणार आहे, याची माहिती स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. 20 जानेवारीला सकाळी 9.00 वाजता अंतरवाली सराटीपासून पद यात्रा सुरू होईल. दुपारी कोळगाव, ता. गेवराई येथे भोजन आणि मातोरी, ता. शिरूर येथे रात्री मुक्काम असणार आहे.

  • 21 जानेवारी
    दुपारी भोजन – तनपुरवाडी, ता. पाथर्डी
    रात्री मुक्काम – बाराबाभली ( करंजी घाट )
  • 22 जानेवारी
    दुपारी भोजन – सुपा
    रात्री मुक्काम – रांजणगाव ( गणपती )
  • 23 जानेवारी
    दुपारी भोजन – कोरेगावं भीमा
    रात्री मुक्काम – चंदननगर (खराडी बायपास) पुणे
  • 24 जानेवारी
    पुणे शहर – जगताप डेअरी – डांगे चौक – चिंचवड – देहूफाटा
    रात्री मुक्काम – लोणावळा
  • 25 जानेवारी
    दुपारी भोजन – पनवेल
    रात्री मुक्काम – वाशी

26 जानेवारी रोजी चेंबूर वरून पदयात्रा निघून थेट आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क येथे दाखल होत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होणार आहे.

Published on: Jan 15, 2024 05:59 PM