मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं, सदावर्ते यांचं चिथावणीखोर वक्तव्य अन् विरोधकांचा हल्लाबोल
tv9 Marathi Special Report | चिथावणीखोर विधानांमुळे गुणरत्न सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला आहे. त्यावरुन राज्यात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगू लागले आहेत. सदावर्तेंवर अशाप्रकारच्या आक्षेपांची ही पहिलीच वेळ नाही, याआधी सदावर्तेंनी चिथावणीची भाषा केली होती.
मुंबई, २७ ऑक्टोबर २०२३ | चिथावणीखोर विधानांमुळे गुणरत्न सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला आहे. त्यावरुन आता राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगू लागले आहेत. मतं मांडण्याचा आणि विरोधाचा अधिकार असला तरी चिथावणीखोर विधानं करणाऱ्यांना सरकारनं समज दिली जाण्याचीही मागणी होऊ लागलीय. सनद रद्द झालेले वकील सदावर्तेंनी अशी काही विधानं केली की, ज्यामुळे मराठा आंदोलकांनी त्यांची वाहनं फोडली. कायदा हाती घेऊन वाहनं फोडण्याचा निषेध व्हायलाच हवा. मात्र एखादा व्यक्ती आणि विचारांना विरोध करताना आपण जमलेल्या समाजालाच जर जत्रा म्हणत असू, तर त्याचं चिंतन स्वतः सदावर्तेंनीच अधिक करायला हवं. तर सदावर्तेंवर अशाप्रकारच्या आक्षेपांची ही पहिलीच वेळ नाही, याआधी सदावर्तेंनी उदयनराजेंवरुन राजेशाही राहिलेली नाही म्हणत ज्याप्रकारे चिथावणीची भाषा केली होती. त्याच सदावर्तेंनी नंतर एसटी निवडणुकीवेळी साताऱ्यात जाऊन उदयनराजेंचा जयजयकारही केला. दुसरीकडे सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनीही चिथावणीची भाषा वापरली आहे. बघा काय म्हणाले ते…