दगा फटका करण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा डाव? जरांगे पाटील यांना मराठा नेत्याचं उत्तर
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दगा फटका करण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा डाव असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. यावर मराठा नेता नरेंद्र पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जरांगे पाटलांना कसली भीती आहे मला माहित नाही परंतु सातत्याने देवेंद्र फडणवीसांवर व्यक्तीशय टीका करणं हे चुकीचे आहे.'
नवी मुंबई, १ नोव्हेंबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दगा फटका करण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा डाव असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. यावर मराठा नेता नरेंद्र पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जरांगे पाटलांना कसली भीती आहे मला माहित नाही परंतु सातत्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्यावरती व्यक्तीशय टीका करत आहेत हे चुकीचे आहे. तर शरद पवारांची राष्ट्रवादी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शामिल झाली याचा राग आहे का? उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले याचा राग आहे का? त्यांचा नेमका बोलता धनी कोण आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. बीडमध्ये आमदारांच्या घरांची जाळपोळ झाली तेव्हा चुकीचे शब्द गृहमंत्र्यांबद्दल काढले हे फार चुकीचं आहे. जरांगेजी तुम्ही चांगले आंदोलन करते आहात मी तुम्हाला 2018 पासून ओळखतो गृहमंत्रांकडे आमदारांची तक्रार आली त्यांच्या जीवाला धोका आहे. कुठल्याही आमदार किंवा लोकप्रतिनिधी तक्रार गृहमंत्र्यांकडे केल्यानंतर तिथे कारवाई करण्याचा निर्णय त्यांनी घेतला तर त्यात काय चुकलं, असेही ते म्हणाले.