Video | मराठा आरक्षणाच्या आशा पल्लवित, शिंदे-किरेन रिजिजू भेटीतून यश मिळणार?
मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेणार आहेत. हे मराठा आरक्षणासाठी सकारात्मक संकेत असल्याची प्रतिक्रिया मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे.
दत्ता कनवटे, औरंगाबाद मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) कायदा मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांची भेट घेणार आहेत. या भेटीमुळे आरक्षणाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टातील पुनर्विचार याचिकेच्या आधारे आरक्षण मिळू शकतं, असं सूचक वक्तव्य पाटील यांनी केलंय आहे. टीव्ही ९ वे विनोद पाटील यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. ते म्हणाले, मराठा आरक्षण दोन प्रकारे मिळू शकतं. सुप्रीम कोर्टातली पुनर्विचार याचिका निकाली निघाली तर हे घडू शकतं. किंवा नव्याने आरक्षण दिलं तर… केंद्राची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्राशी चर्चा करून भूमिका घेण्याचं पाऊल उचललंय, ते स्वागतार्ह आहे.
Published on: Sep 22, 2022 02:28 PM
Latest Videos