फडणवीस सरकारने दिलेलं मराठा आरक्षण दिशाभूल, पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हटले?
फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण बेकायदेशी ठरल्याचा आरोप करत केवळ मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. केंद्र सरकारच्या घटनादुरूस्तीमुळेच मराठा आरक्षण रद्द ठरल्याचा आरोप होतोय. तर सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द करताना काय म्हटलं होतं? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, २० सप्टेंबर २०२३ : देवेंद्र फडणवीस सरकारने २०१८ साली दिलेलं आरक्षण म्हणजे दिशाभूल आहे. असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. केंद्राच्या १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे राज्याला मागास प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार नव्हता असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. फडणवीस सरकारने दिलेलं मराठा आरक्षण महाविकास आघाडीला कोर्टात टिकवता आलं नाही, असं आरोप भाजप करतंय. मात्र मोदी सरकारच्या घटनादुरूस्तीमुळे फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण बेकायदेशी ठरल्याचा आरोप करत केवळ मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. केंद्र सरकारच्या घटनादुरूस्तीमुळेच मराठा आरक्षण रद्द ठरल्याचा आरोप होतोय. तर सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द करताना जे म्हटलं होतं त्यामध्ये केंद्राच्या घटना दुरूस्तीचाही उल्लेख होता. सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द करताना काय म्हटलं होतं? बघा स्पेशल रिपोर्ट