मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा एल्गार, लवकरच करणार महाराष्ट्र दौरा, कसं असणार नियोजन?
१ डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावात मनोज जरांगे पाटील यांनी साखळी उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे म्हणत मराठा बांधवांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हा दौरा कधीपासून सुरु होणार ते उद्या किंवा परवा जाहीर होणार
छत्रपती संभाजीनगर, ५ नोव्हेंबर २०२३ | ‘मी ठणठणीत आहे. काळजी करू नका. आता आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही’, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. मनोज जरांगे पाटील हे पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार असून मराठा बांधवांची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर सरकारचं शिष्टमंडळ भेटण्यासाठी येणार असून सरकारचं शिष्टमंडळ टाईमबॉन्डबाबत चर्चा करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. १ डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. हे साखळी उपोषण शांततेत करण्याचं आवाहनही कार्यकर्त्यांना मनोज जरांगे पाटील यांनी केले. तर महाराष्ट्रातील दौरा कधीपासून सुरु होणार ते उद्या किंवा परवा जाहीर करणार असल्याचे जरांगे यांनी म्हटलं यासह या दौऱ्यात आतापर्यंत राहिलेल्या भागांत आपण जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.