Maratha Reservation : राज्य शासनाला धक्का; मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Maratha Reservation : राज्य शासनाला धक्का; मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

| Updated on: Apr 21, 2023 | 7:03 AM

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी याचिकेतून न्यायालयाला करण्यात आली होती.

नवी दिल्ली : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्वोच्च न्ययालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला हा सगळ्यात मोठा धक्का मानला जात आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी याचिकेतून न्यायालयाला करण्यात आली होती. मात्र आता ही याचिकाच न्यायालयाने फेटाळल्याने मराठा आरक्षणचा मुद्दा पुन्हा अधांतरी झाला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून काय भूमिका सांगण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Apr 21, 2023 07:03 AM