रडगाण्या ऐवजी सनईचे सूर, स्मशानभूमीत पार पडला विवाहसोहळा; नेमकं प्रकरण काय? पाहा व्हिडीओ

रडगाण्या ऐवजी सनईचे सूर, स्मशानभूमीत पार पडला विवाहसोहळा; नेमकं प्रकरण काय? पाहा व्हिडीओ

| Updated on: Jul 26, 2023 | 10:18 AM

जिथे मानवाच्या जीवनाचा शेवट होतो अशा ठिकाणी नवं दाम्पत्याने वैवाहिक जीवनाची सुरूवात केली‌ आहे. धक्का बसला ना वाचून? पण हो असं घडलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरातील स्मशानभूमीत.

अहमदनगर, 26 जुलै 2023 | जिथे मानवाच्या जीवनाचा शेवट होतो अशा ठिकाणी नव दाम्पत्याने वैवाहिक जीवनाची सुरूवात केली‌ आहे. धक्का बसला ना वाचून? पण हो असं घडलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरातील स्मशानभूमीत. या स्मशानभूमीत गेल्या वीस वर्षापासून काम करणारे गंगाधर गायकवाड यांनी आपल्या मुलीचा विवाह स्मशानभूमीतच लावलाय. या स्मशानभूमीत वर मनोज आणि वधू मयुरी यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडलाय. ज्या स्मशानभूमीत मयुरी लहानची मोठी झाली तिथेच तीने लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आणि अनेक मान्यवराच्या‌ उपस्थीतीत हा विवाहसोहळा पार पडलाय..

Published on: Jul 26, 2023 10:18 AM