Railway Mega Block : रविवारी लोकलने प्रवास करताय? मध्य रेल्वे मार्गावरील ‘या’ स्थानकांवर ट्रेन नसणार
मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रविवारी लोकल ट्रेनने तुमचं बाहेर जाण्याचं नियोजन असेल तर रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक पाहूनच घराबाहेर पडा...
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांनो रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलने घराबाहेर पडणार असाल तर मध्यरेल्वेच्या ब्लॉकचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा म्हणजे तुमची गैरसोय होणार नाही. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी रेल्वे स्थानक ते विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान, तब्बल पाच तासांचा मेगाब्लॉक हा येत्या रविवारी घेण्यात येणार आहे. या पाच तासांच्या मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वे मार्गावरील काही रेल्वे सेवा रद्द करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर सीएसएमटी रेल्वे स्थानक ते विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानक ते विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. मस्जिद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करीरो़ड या रेल्वे स्थानकावर उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध नसणार आहेत, त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी महत्त्वाची कामं असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.