मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा होणार वाहतूक कोंडी? कधी आणि किती तासांचा असणार ट्राफिक ब्लॉक?
VIDEO | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करताय? एक्स्प्रेस वेवर पुन्हा होणार वाहतूक कोंडी? मग हा व्हिडीओ नक्की बघा
पुणे, 28 जुलै 2023 | पुणे घाटमाथ्यावर आणि लोणावळा परिसरात अतिमुसळधार पाऊस कोसळत असल्याने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर त्याचा परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे अर्थात पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग हा नेहमीच वाहनांनी गजबजलेला असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर त्याचा परिणाम झाला आहे. या मार्गावर पुन्हा दरड कोसळली. गेल्या ८ दिवसांत दुसऱ्यांदा दरड कोसळण्याची घटना घडल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्यांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. कामशेत बोगद्याजवळ मातीचा ढिगारा गुरुवारी कोसळला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्यासाठी पुणे, मुंबई द्रुतगती मार्गावर शुक्रवारी पुन्हा दोन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सलग दुसऱ्या दिवशी ब्लॉक घेण्यात येणार आहे. दोन तासांच्या हा ब्लॉक पुणे हद्दीतील कामशेत बोगद्याजवळ होणार आहे. या ठिकाणी सैल झालेली दरड हटवली जाणार आहे.