धक्कादायक ! शालेय पोषण आहारात जिवंत उंदीर अन् कीड, कुठं होतोय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ?

VIDEO | शालेय पोषण आहार सामग्रीतील चणा, वाटाणा आणि डाळीला कीड लागली असून तांदूळ ठेवलेल्या कोठीत आढळले जिवंत उंदीर; विद्यार्थ्यांचे पालक संतप्त, प्रशासनाचे चौकशीचे आदेश, कुठला आहे हा धक्कादायक प्रकार?

धक्कादायक ! शालेय पोषण आहारात जिवंत उंदीर अन् कीड, कुठं होतोय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ?
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 7:34 PM

भंडारा, १५ ऑगस्ट २०२३ | मध्यान्ह भोजन योजनेच्या नावाखाली कंत्राटदरानं पुरवठा केलेली आहार सामग्री अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यातील चणा, वाटाणा आणि डाळीला कीड लागली असून तांदूळ ठेवलेल्या कोठीत जिवंत उंदीर आढळून आलेत. हा सर्व धक्कादायक प्रकार भंडाऱ्यातील नेरला इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची 24 तासात चौकशी करून तत्काळ अहवाल सदर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी दिलेत. यात दोषींवर कारवाई करू असं आश्वासन ग्रामस्थांना दिल्यानंतर ग्रामस्थांचा रोष शांत झाला.

मध्यान्ह भोजन आहाराची सामग्री पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, हे साहित्य निकृष्ट दर्जाचं असल्याचं तपासणीत सिद्ध झाल्यानं जिल्हा परिषद शिक्षण समितीनं सदर कंत्राटदारानं पुरवठा केलेली सामग्री वापस न्यावी आणि त्याच्यावर कारवाई करावी, असा ठराव जिल्हा परिषद शिक्षण समितीनं घेतला आहे. यानंतरही या कंत्राटदाराचं साहित्य पुरवठ्याचं काम थांबलेलं नाही. अशातच पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नेरला येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शनिवारी मध्यान्ह भोजन उपक्रमात शिजवलेल्या भोजनात मोठ्या प्रमाणात किडे आढळून आल्यानं पालकांनी शाळेतील शिक्षकांना धारेवर धरल्याचे समोर आले आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.