म्हणून मी राजीनाम्याची वाच्यता केली, अडीच महिन्यांनी छगन भुजबळ यांनी का केला खुलासा?

म्हणून मी राजीनाम्याची वाच्यता केली, अडीच महिन्यांनी छगन भुजबळ यांनी का केला खुलासा?

| Updated on: Feb 04, 2024 | 10:35 PM

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर मुख्यमंत्र्यांनी भुजबळांची हकालपट्टी करून लाथ मारून मंत्रिमंडळातून बाहेर काढावं, असं वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर भुजबळांनी संजय गायकवाड यांच्या वक्तव्याला उत्तर दिलंय

नाशिक, ४ फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर मुख्यमंत्र्यांनी भुजबळांची हकालपट्टी करून लाथ मारून मंत्रिमंडळातून बाहेर काढावं, असं वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर भुजबळांनी संजय गायकवाड यांच्या वक्तव्याला उत्तर देत आपण 16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिला असल्याचा गौप्यस्फोट केला. मात्र राजीनामा दिला ते अडीच महिन्यांनी का सांगितलं? असा सवाल विरोधकांकडून केला जात होता. याला भुजबळांनी उत्तर दिलंय. “मी 17 तारखेला अंबडच्या जाहीर सभेला जाण्याअगोदर माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून तो अजित पवार यांच्या कार्यालयात दिला. मला अंबडला जाताना निरोप आला की, याबाबत वाच्यता करु नका. मी अंबडमध्ये वाच्यता केली नाही. आल्यानंतर मख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मला बोलावून घेतलं. मग अजित पवारांनी सांगितलं की, तुमचा राजीनामा मी मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे.”

Published on: Feb 04, 2024 10:35 PM