आधी हे थांबव... खूप उपकार होतील, छगन भुजबळ यांची हतबल होऊन मनोज जरांगे पाटलांना काय विनंती?

आधी हे थांबव… खूप उपकार होतील, छगन भुजबळ यांची हतबल होऊन मनोज जरांगे पाटलांना काय विनंती?

| Updated on: Feb 06, 2024 | 4:27 PM

भुजबळांनी आधी तलाठी व्हावं, असं मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य केले होते. यावर छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवलाय. भुजबळ म्हणाले, मनोज जरांगे पाटील आमच्यात फूट पाडत आहे. अरे तू तर आमच्या नाभिक आणि धनगर समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचं काम करतोय.

मुंबई, ६ फेब्रुवारी २०२४ : छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला तर दिला आम्हाला काय त्याच्याशी? आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार. भुजबळांनी आधी तलाठी व्हावं, असं मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य केले होते. यावर छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवलाय. भुजबळ म्हणाले, मनोज जरांगे पाटील आमच्यात फूट पाडत आहे. कधी म्हणतो धनगरांच्या बाजूने लढणार, कधी म्हणतो नाभिक समाजाच्या बाजूने लढणार…अरे तू तर आमच्या नाभिक आणि धनगर समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचं काम करतोय. ते थांबव आधी. खूप उपकार होतील आमच्यावर. ओबीसीतूनच तुझं आरक्षण घेण्याचं काम चाललंय. ते तू आधी मागे घे. ओबीसी समाज तुझे उपकार मान्य करेल, असं छगन भुजबळ म्हणाले. तर यावेळी त्यांनी जरांगे पाटलांना चॅलेंज देत म्हटले, तू आधी ग्रामपंचायतीला उभा राहा. छगन भुजबळ ग्रामपंचायत नाही, मुंबईच्या महानगरपालिकेत 25 वर्ष निवडून येऊन दोन वेळा महापौर झाला. दोन वेळा आमदारही झाला. त्यानंतर येवल्याला चारवेळा आमदार झाला. तू मला सांगण्याची गरज नाही. तू आधी नीट उभा राहा, असं भुजबळ यांनी म्हटले.

Published on: Feb 06, 2024 04:27 PM