मनोज जरांगे पाटील म्हणतील तसा GR काढला पाहिजे, छगन भुजबळ यांचा टोला काय?
अल्टिमेटमला दोन दिवस बाकी असताना जरांगे पाटील यांनी परभणीच्या शेलू गावातून सरकारला पुन्हा इशारा दिलाय. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना आरक्षण देण्यापासून रोखू शकत नाही, असे जरांगे म्हणाले. या वक्तव्यावरून छगन भुजबळ यांचा जरांगेंना उपरोधिक टोला काय?
मुंबई, २३ डिसेंबर २०२३ : सरकारला दिलेल्या २४ डिसेंबरच्या अल्टिमेटवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. आता पुढचं लक्ष म्हणजे बीडची सभा आहे. अशातच काल मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार हल्लाबोल करण्याऐवजी जरांगे पाटील यांच्यावर उपरोधिक टीका आणि टोलेबाजी केली. अल्टिमेटमला दोन दिवस बाकी असताना जरांगे पाटील यांनी परभणीच्या शेलू गावातून सरकारला पुन्हा इशारा दिलाय. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना आरक्षण देण्यापासून रोखू शकत नाही, असे जरांगे म्हणाले. या वक्तव्यावरून छगन भुजबळ यांनी जरांगेंना उपरोधिक टोले लगावले. गुरूवारी सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली. मात्र सोयरे या शब्दावरून ही चर्चा फिस्कटली. काय होतं जरांगे पाटील यांचं म्हणणं? तर यावर शिष्टमंडळातील मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले?
Published on: Dec 23, 2023 10:40 AM
Latest Videos