मंत्रिपदासाठी पैसे मागितले….? १ कोटीची चेक उद्धव ठाकरेंकडे दिला; सरकारच्या मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट
'मंत्रीपदासाठी मी उद्धव ठाकरे यांना एक कोटी रुपयांचा चेक दिला होता. त्यांनी अजूनही पैसे मागितले होते मात्र माझ्याजवळ तेवढे पैसे नव्हते त्यामुळे मी देऊ शकलो नाही आणि त्यामुळे माझं मंत्रीपद हुकलं होतं असा घणाघाती आरोप', सरकारच्या मंत्र्यानं केला
सिंधुदुर्ग, ७ फेब्रुवारी २०२४ : उद्धव ठाकरे यांच्याकडे मी १ कोटी रूपयांचा चेक दिला होता. मंत्रिपदासाठी त्यांनी पैसे मागितले की पक्षनिधीसाठी हे मला माहिती नाही, असा मोठा गौप्यस्फोट सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी केला. भर पत्रकार परिषदेमध्ये दीपक केसरकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे. तर मंत्रीपदासाठी मी उद्धव ठाकरे यांना एक कोटी रुपयांचा चेक दिला होता. त्यांनी अजूनही पैसे मागितले होते मात्र माझ्याजवळ तेवढे पैसे नव्हते त्यामुळे मी देऊ शकलो नाही आणि त्यामुळे माझं मंत्रीपद हुकलं होतं असा घणाघाती आरोप दीपक केसरकर यांनी केला. मी माझी वडिलोपार्जित जमीन विकून हे पैसे दिले असा खुलासा देखील मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.

VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त

चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?

पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा

ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
