Hasan Mushrif : कारची तोडफोड; व्हिडीओ आला समोर अन् हसन मुश्रीफ म्हणाले, त्यांच्यावर कठोर कारवाई करू नये
मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारने घेऊन यावर लवकरात लवकर तोडगा काढावाच लागेल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. तर यावेळी त्यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याबाबतही त्यांनी भाष्य केले आहे. मात्र कारवर झालेल्या तोडफोडीवर बोलताना त्यांनी याप्रकरणी कठोर कारवाई करू नये, असे म्हटले.
मुंबई, १ नोव्हेंबर २०२३ | मंत्रिमंडळातील बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा झाली आणि आज सर्वपक्षीय बैठक आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारने घेऊन यावर लवकरात लवकर तोडगा काढावाच लागेल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. तर यावेळी त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबतही त्यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, माझ्या गाडीची तोडफोड झाली. या प्रकरणी कोणावर कारवाई करू नये, असं मी गृहखात्याला सांगणार आहे. तर आमदारांची घरं जाळणं हे प्रकार दुर्वैवी आहे. मराठा आंदोलनाला नेतृत्व फारसं दिसत नाही. या तरूणांना समजावून सांगितलं पाहिजे की आंदोलनाची दिशा कशी असावी, त्यामुळे अशा घटना घडताय. पुढे ते असेही म्हणाले, टार्गेट करून एकमेकांचे स्थानिक विरोधक तेच अशा घटना घडवून आणत आहेत की काय? अशी शंका निर्माण होत आहे. सत्ताधारी आमदार स्वत:ची घरं जाळतील, गाड्या जाळतील असं होईल का? असा सवालही त्यांनी केलाय. तर अशा घटना कोण घडवून आणतंय ते बघणं गरजेचं असल्याचे त्यांनी म्हटलंय.