मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीत सामील होणार? रामदास आठवले स्पष्टच म्हणाले…
VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीत सामील होणार का? असा प्रश्न केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना विचारला असता पाहा ते काय म्हणाले? रामदास आठवले हे पंढरपूर आणि सांगोला दौऱ्यावर असताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी ते बोलत होते.
सोलापूर, २४ ऑगस्ट २०२३ | केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे पंढरपूर आणि सांगली दौऱ्यावर आहेत. यादरम्यान मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी निमंत्रण दिल्याने आपण आल्याचे सांगताना राज्यात मनसे महायुतीत येणार का याचे उत्तर राज ठाकरे देऊ शकतील असे त्यांनी सांगितले. पुढे ते असेही म्हणाले, आपण शिर्डीमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोलापूरमध्ये बोलत असताना म्हटले. तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपण शिर्डी आणि सोलापूर अशा दोन राखीव मतदार संघावर भाजपकडे आरपीआयने दावा केला आहे. शिर्डीमधील जनतेने आपणास संधी द्यावी. शिर्डीमध्ये निवडणूक लढवण्यास आपण उत्सुक आहोत. याबाबत आपण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी बातचीत केली आहे.