Manoj jarange यांच्या भेटीला पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ, उपोषण मागे घेणार? अवघ्या महाराष्ट्र लक्ष
VIDEO | मराठा आरक्षण मिळण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी पुन्हा शिंदे सरकारचं शिष्टमंडळ जालन्यात दाखल, मंत्री संदीपान भुमरे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर हे मनोज जरांगे यांच्या भेटीला...
जालना, १२ सप्टेंबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील मागणीवर ठाम असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ जालन्यात दाखल झाले आहे. मंत्री संदीपान भुमरे आणि माजी मंत्री अर्जून खोतकर हे जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी पोहोचले. यावेळी या दोघं मंत्र्यांसोबत शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे देखील पाहायला मिळाले. दरम्यान, कालच सर्वपक्षीय बैठक पार पडली. याबैठकीत झालेल्या निर्णयाबाबत मनोज जरांगे पाटील यांच्याशी या नेत्यांनी चर्चा केली. या भेटीदरम्यान, तब्येतीला सांभाळा. उपोषण मागे घ्या, अशी विनंती करत मनोज जरांगे यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला. या चर्चेनंतर आता मनोज जरांगे पाटील गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेले आपलं उपोषण मागे घेणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
Published on: Sep 12, 2023 11:38 AM
Latest Videos