संजय राऊत यांच्या 'त्या' टीकेला  शंभूराज देसाई यांचं रोखठोक प्रत्युत्तर, गेल्या अडीच वर्षात...

संजय राऊत यांच्या ‘त्या’ टीकेला शंभूराज देसाई यांचं रोखठोक प्रत्युत्तर, गेल्या अडीच वर्षात…

| Updated on: Mar 07, 2023 | 11:19 PM

VIDEO | राष्ट्रवादी नंबर वनला गेली तर..., मंत्री शंभूराज देसाई यांनी नेमका काय लगावला टोला? बघा व्हिडीओ

मुंबई : राज्यात राजकीय धुळवड जोरदार सुरू असताना दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असल्या तरी एकमेकांवर केलेल्या आरोपांना उत्तर-प्रत्युत्तर देणंही सुरू आहे. खासदार संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भाजप तुमचा वापर करते आहे आणि ते तुम्हाला भविष्यात कळेल, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला इशारा दिला होता. तर या टीकेला प्रत्युत्तर देत मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या अडीच वर्षात त्यांनी तर कुणी कुणाचा वापर केला आहे हे कळालं असा टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री केले मात्र नंबर वनला गेलं कोण तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष गेला पाच नंबरवर. त्यामुळे फायदा कुणाला आणि तोटा कुणाला झाला याचा एकदा तुम्हीच विचार करा असा टोलाही शंभूराज देसाई यांना लगावला.

 

 

Published on: Mar 07, 2023 11:18 PM