मलिकांना सत्तेत घेण्याचा प्रयत्न? शिंदे गटाचा मंत्री म्हणतो, ‘त्या फक्त वावड्याच’
विशेष म्हणजे यावेळी ईडीकडून सर्वोच्च न्यायालयात या जामीनाविरोधात कोणतीच आडकाठी करण्यात आलेली नाही. त्यामुळे यात नक्कीच काहीतरी काळबेरं असल्याची चर्चा रंगली आहे. तर नवाब मलिक बाहेर येताच अजित पवार गटाकडून त्यांना त्यांच्या प्रवेशासाठी प्रयत्न केले जात आहेत
मुंबई : 16 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची जामीनावर सुटका झाली आहे. तब्बल दीड एक वर्षानंतर मलिकांची सुटका झाली आहे. तर त्यांना वैद्यकीय कारणाने हा जामीन मिळालेला आहे. विशेष म्हणजे यावेळी ईडीकडून सर्वोच्च न्यायालयात या जामीनाविरोधात कोणतीच आडकाठी करण्यात आलेली नाही. त्यामुळे यात नक्कीच काहीतरी काळबेरं असल्याची चर्चा रंगली आहे. तर नवाब मलिक बाहेर येताच अजित पवार गटाकडून त्यांना त्यांच्या प्रवेशासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मलिक यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना सत्तेत घेण्यासाठीच हे सगळं सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. यावरून शिंदे गटाचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी टीका केली आहे. तर मलिकांबाबत या सर्व वावड्या उठवल्या जात आहेत. त्यांच्याबाबत असा कोणताच विचार नाही. तर त्यांनी सत्तेत घेण्यासाठी कुणीच प्रयत्न करत नाही असेही त्यांनी स्पष्टीकरण देताना अशा वावड्या कोण उठवत आहे असा सवाल केला आहे.