... अन् स्मृती इराणी कार्यक्रम सोडून निघून गेल्या, पुण्यात नेमकं काय घडलं?

… अन् स्मृती इराणी कार्यक्रम सोडून निघून गेल्या, पुण्यात नेमकं काय घडलं?

| Updated on: Dec 10, 2023 | 10:32 PM

‘दो धागे श्रीराम के लिए' या कार्यक्रमाच्या उद्धाटनासाठी आलेल्या मंत्री स्मृती इराणी कार्यक्रम सोडून निघून गेल्यात. पुण्यातील या कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्याने त्या व्यासपीठावर गेल्याच नाही तर त्यांनी कार्यक्रम सोडून जाणं पसंत केलं.

पुणे, १० डिसेंबर २०२३ : केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर असताना अनोखा प्रकार पाहायला मिळाला. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र, अयोध्या आणि पुण्यातील हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित ‘दो धागे श्रीराम के लिए’ या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा होता. मात्र ‘दो धागे श्रीराम के लिए’ या कार्यक्रमाच्या उद्धाटनासाठी आलेल्या मंत्री स्मृती इराणी कार्यक्रम सोडून निघून गेल्यात. पुण्यातील या कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्याने त्या व्यासपीठावर गेल्याच नाही तर त्यांनी कार्यक्रम सोडून जाणं पसंत केलं. ‘दो धागे श्रीराम के लिए’ या कार्यक्रमाच्या पहिल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. तर अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी स्मृती इराणी स्वतः प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीसाठी वस्त्रही विणलं. यावर आयोजकांना विचारणा केली असता मंत्री स्मृती इराणी यांचे पुर्वनियोजित कार्यक्रम असल्याने ते निघून गेल्याचे म्हटले आहे.

Published on: Dec 10, 2023 10:32 PM