Special Report | तानाजी सावंत यांचं सुषमा अंधारे यांच्याबाबत 'ते' विधान, महाराष्ट्रात नवा वाद

Special Report | तानाजी सावंत यांचं सुषमा अंधारे यांच्याबाबत ‘ते’ विधान, महाराष्ट्रात नवा वाद

| Updated on: May 28, 2023 | 9:51 AM

VIDEO | तानाजी सावंत नव्या वादात, मंत्री तानाजी सावंत यांच्या भाषेवरून विरोधक आक्रमक

मुंबई : शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आणि गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेली टीका वादात आल्यानंतर तानाजी सावंत यांनी वापरलेले शब्द वादात सापडले आहेत. सुषमा अंधारे यांच्याविरोधात शिंदे गटातील नेत्यांची वादग्रस्त विधान सुरूच आहेत. राष्ट्रवादीने एक महिला ठाकरे गटाला भाडे तत्वावर दिलीये, असे विधान करून मंत्री तानाजी सावंत नव्या वादात सापडलेत. याआधी गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांचा उल्लेख सिनेमातील बाई असा केला होता. तर संजय शिरसाट यांनी वापरलेल्या शब्दाचं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. राजकारणात टीकेला टीका असं उत्तर स्वाभाविक आहे. पण वैयक्तिक आरोप, मारहाणीपर्यंत मजल जाते तेव्हा त्याचा निषेध होणं गरजेचं आहे. ज्यावेळी भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली होती. तेव्हा विरोधी पक्षनेते अजिप पवार यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात आला होता. मात्र बीडमध्ये सुषमा अंधारे यांच्यावर कथित मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला तेव्हा शिंदे गटाचा सूर अप्रत्यक्षपणे समर्थनाचा राहिला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: May 28, 2023 09:51 AM