MSRTC | एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाची मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक, काय झाली चर्चा?
VIDEO | एसटी कर्मचारी प्रलंबित मागण्यांवरून आक्रमक, मागण्या मान्य न केल्याने एसटी संघटनांनी राज्य सरकारला बेमुदत उपोषणाचा दिला इशारा. याबाबत मंत्री उदय सामंत आणि एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाची झाली बैठक
मुंबई, ११ सप्टेंबर २०२३ | एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कामगार संघटनेकडून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आज यावर तोडगा काढण्यासाठी मंत्री उदय सामंत यांच्यासोबत एसटी कामगारांच्या शिष्टमंडळासह सह्याद्रीवर बैठक पार पडली. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता मिळावा, घरभाडे मिळावे, वार्षिक वेतनवाढीची रक्कम फरकासह मिळावी, यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन केले जात आहे. तर या मागण्यांवर विचार करण्यासाठी एसटीच्या कामगार संघटनांनी दोन दिवसांचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला आहे. मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठकीत महागाई आणि घरभाडं भत्त्याच्या थकबाकीबाबत चर्चा करण्यात आली. यासह वेतन वाढीचा दर ५ ते ६ वर्षांपासून थकीत असल्याच्या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा झाली.