AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांचं मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र अन् केली प्रश्नांची सरबत्ती

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांचं मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र अन् केली प्रश्नांची सरबत्ती

| Updated on: Nov 07, 2023 | 10:53 PM

आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र. या पत्रात त्यांनी रस्त्यावरील फर्निचर घोटाळ्याबाबत त्यांना केली विचारणा. इतकंच नाहीतर खोके सरकार धूर्तपणे घोटाळा पुढे नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा केला आदित्य ठाकरे यांनी सरकारवर आरोप.

मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३ \ आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र लिहिल्याचे समोर आले आहे. या पत्रात त्यांनी रस्त्यावरील फर्निचर घोटाळ्याबाबत त्यांना विचारणा केली आहे. इतकंच नाहीतर खोके सरकार धूर्तपणे घोटाळा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही लवकरच सरकार स्थापन करून महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांना कायद्याच्या कठड्यात उभे करू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून BMC मधील २६३ कोटींचा घोटाळा उघडकीस आणला आहे. मी रस्त्यावरील फर्निचर घोटाळा आणि त्यामुळे आपल्या मुंबई शहरात निर्माण होत असलेल्या गोंधळाबाबत अधिक स्पष्टता मिळविण्यासाठी महत्वाचे मूलभूत प्रश्न विचारले होते. मुंबईकरांच्या कष्टाने कमावलेल्या पैश्यांचा गैरवापर करून BMC वर नियंत्रण असलेले सरकारमधले लोक कंत्राटदारांचा फायदा करून घेत असल्याचे ठाकरेंनी म्हटले.

तर रस्त्यावरील फर्निचरचा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर, जुलै २०२३ मध्ये, बेकायदेशीर आणि अनैतिक मुख्यमंत्र्यांनी BMC च्या कथित २६३ कोटी रुपयांच्या स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणाही केली. या चौकशीचे पुढे काय झाले असा सवाल आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्तांना केला आहे.

Published on: Nov 07, 2023 10:52 PM